Wednesday, 10 April 2024

शेवटचं पाहणं

तुला फुलांचा नजराणा देतांना
फुलाचं हातून सुटणंच लिहिलं होतं
कोमळ प्रेमाचे भाव व्यक्त करताना
जिभेचे विषयावरून भटकनंच लिहिलं होतं.

पाऊस पडून झाल्यावर आकाशात
इंद्रधनुषी छटा सर्वत्र पसरल्या होत्या
भोवरा फुलातील रस चाखताना
लाल गुलाबी पाकळ्या लाजिरवाण्या झाल्या होत्या,
त्याचप्रमाणे तुझ्याही चेहऱ्यावर प्रेमाचे रंग सजवताना
रंगाचं संपूर्ण संपणच लिहिलं होतं.

प्रणय निवेदन करीत असताना तोता मैना
चोचित चोच घालून चुंबणे वर्षावित होते
रात्रीच्या धुंद अशा चंद्र प्रकाशात 
तारे त्याच कडून आज अमृत चाखित होते
त्याचप्रमाणे तुझ्याही ओठांवर 
अमृताची चाख देण्याच्या विचारात
मध्येच तुझ्या लटेचं येणं लिहिलं होतं.

नियतीचा हा खेळ किती क्रूर आहे 
याचाच मी ध्यास घेत होतो 
तिनेच मला या खेळात गोवल्यावर 
माझे मीच त्यात गुंफून जात होतो 
नियतीच्या या चक्राचे भेदन कसे करावे 
यावर तिनेच, या नियतीनेच माझ्यासाठी 
फक्त विचार करणे लिहिलं होतं 
फक्त विचार करणे लिहिलं होतं.

तुला फुलांचा नजराणा देतांना
नियतीनेच ते हिसकावून घेतलं
कोमळ प्रेमाचे भाव व्यक्त करताना 
तिनेच ते शब्द हिरावून घेतले 
आणि म्हणूनच तू सामोरे असताना देखील 
माझ्याकडून प्रणय निवेदनाची आशा असून देखील
माझं तुला न्याहाळनंच लिहिलं होतं 
आता डोळे भरून "शेवटचं पाहणंच" लिहिलं होतं.