तू जवळ नसल्याची मग मला हमी वाटते.
मग मी पक्षी बनून दूरवर विचरत जातो
तुझ्या सहवासाचे क्षण खेचून आणत जातो
त्या क्षणांतून क्षणिक आनंद मिळवतांना
उरातून तुझ्या विरहाचे दुःख मनी दाटते
तू जवळ नसल्याची मग मला हमी वाटते.
सकाळी उठल्यावर नसते सोबत तुझी साथ
नसतो छातीवर ठेवलेला तुझा कोमल हाथ
सकाळचा मंद वारा हळुवार सुटल्यावर
दूर कोठून त्यात तुझ्या शरीराचा परिमल भासते
तू जवळ नसल्याची मग मला हमी वाटते.
दिवसा कधी एकांत क्षणी, ध्यास घेतो मी जेव्हा मनी
असतो मी राजा अन तू माझी स्वप्न राणी
पण सारीपाटाचा खेळ असतो सरलेला, सरून उरलेला
हा सर्व भातकुलीचा डाव याची हृदयी खूण पटते
तू जवळ नसल्याची मग मला हमी पटते.
No comments:
Post a Comment