Sunday 21 June 2020

अहेर

जगाच्या मोहपाशात
गुंग झालेला मनुष्य 
धकाधकीच्या दैनंदिनीत
कुंठीत काढतोय आपले आयुष्य.

आशा आहे सुखाची
पण आहेत सर्व दिवास्वप्न
दिवास्वप्नही पूर्ण होऊ शकते
पण वाट आहे ही हावरटपणाची,
आजकाल मनुष्य कमी श्रमात
जास्त पैसा कमाऊ पाहतोय
म्हणूनच गुन्हेगारीच्या दलदलीत 
तो आकंठ डुंबत जातोय.

परतीचे सर्व मार्ग बंद असून
वर तालेही ठोकले असतात
वेळप्रसंगी स्वतःलाच ते
खोटे ठरविण्यास ही धजत नसतात.
शेवटी 'अजेय' मृत्युलाच काढावे लागते बाहेर
व हाच असतो या आयुष्याने त्यांना दिलेला 'अहेर'.

4 comments:

  1. सर, खुप मार्मिक आणि वास्तव मांडणी
    तृष्णा हेच मानवी दुःखाचे कारण आहे

    ReplyDelete
  2. खूप सुंदर 👍

    ReplyDelete