Monday 29 June 2020

तुला आठवायचाच बहाणा

तुझ्या आठवणी आठवून
मनोमनी हसू मज येते
( कसे सांगू सजने तुला)
 कधी मला न दिसल्यास
उदास किती हे मन होते.

तुझ्यापासून दूर राहण्याचा
किती मी प्रयत्न केला होता
(परंतु काय झाले माझे मलाच कळेना)
मन माझे तुझाच आढावा घेत
हा तुझ्या नजरेचा जादू होतं.

डोळे तुझे माझ्या डोळ्यांना मिळताच
मनात कसे तरंग उठायचे
(अहाहा! काय आल्हाददायक क्षण असायचा तो)
तुझ्या डोळ्यांशी लपवाछपवी करणे
मलाही फार फार आवडायचे.

तू सध्या एक कळी आहेस
तरीही सुगंध सर्वत्र दर्वळतेस
(सांगू कसे भोवरे किती आजूबाजूला)
मला तूच हवी असताना सुद्धा
तू मला अशी का जाळतेस?

मला असे सदैव पोळण्यात
तुझ्या ओठांवर सुंदर स्मित उमटते
(एका हास्याचेच दिवाणे आम्ही)
तुझे कोमळ हास्य बघितल्यावरच
माझ्या डोळ्यांचे पारणे फिटते.

तुझे हास्य ओठांवर न दिसता
मन माझे किती हुरहुरते
(तू सदैव हसत राहणारी कळी राहोस)
असे काही झाल्यास सखे
उदास किती मन हे होते.

मनाचे उदास होण्यास आता मी
कोणतेही, कसलेही दुःख समजत नाही
(तुला आठवायचा हा सर्व बहाणा)
सखे, तू मनात बसली असताना
तुझे माझ्याजवळ नसणे समजत नाही.

2 comments:

  1. खुप छान रचना सरजी.. कॉलेजचे गुलाबी प्रेम न्यारेच असते..
    "तुझ्या बांगड्यातील मोत्यांपुढे
    सूर्यप्रकाश फिका भासतो
    हसताना तुला पाहून सजने
    शुभ्र चंद्र काळा वाटतो. ..

    ReplyDelete
    Replies
    1. व्वा.. क्या बात!

      Delete